कोरेगाव, चोप(Gadchiroli):- प्रत्येक कुटुंबाला घर असावे या हेतूने केंद्र शासनाने इतर मागासवर्गीय गरीब कुटुंबांना मोदी आवास योजने अर्तंगत 2022 – 2023 – 2024 वर्षांत घरकुल मंजूर केले. मात्र बहुतांशे घरकुलधारकांना वेळेवर तिसरा अनुदानित हप्ता न मिळाल्याने अनेकांचे घरकुलांचे कामे रखडलेले आहेत. तीन महिन्यात घरकुल बांधण्याचे उदिष्ठ होते परंतु सात ते आठ महिन्याचा कालावधी लोटूनही घरकुलांचे थकीत असलेल्या हप्त्यांमुळे कामे रखटलेली आहेत तर, बहुतांश नागरिकांना राहण्याची सोय नसल्याने इतरांच्या घरी भाड्याने राहावे लागत आहे.
बहुतांश नागरिकांना राहण्याची सोय नसल्याने इतरांच्या घरी भाड्याने राहावे लागत आहे
डिसेंबर ते फरवरी महिन्यात अनेक घरकुलधारकांना प्रत्येक कुटुंबाला घर असावे. या हेतूने केंद्र शासनाने मोदी आवास योजनेला (Modi Awas Yojana) सुरुवात केली. ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी एक लाख वीस हजार शौचालयासाठी (toilet) बांधकासाठी 12000 रुपयाचे अनुदान मिळत आहे तर रोजगार हमी अंतर्गत घरकुलांना 18000 पाणी मजुरी दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभार्थ्यांना अर्ज करण्याची आव्हान केल्याने घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज केला. डिसेंबर ते फरवरी महिन्यात अनेक कुटुंबांना मंजुरी मिळाली तसेच शासनाने घरकुल लाभार्थ्यांच्या खातात अनुदानित 20000 चा पहिला हप्ता जमा केल्याने घरकुल लाभार्थ्यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली. तसेच दुसरा हप्ताही 45000 चा अनुदान हप्ता जमा झाल्याने घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम स्लॅब लेवल पर्यंत गेले असुन, त्यानंतर शासनाकडून बहुतांचे घरकुलधारकांना तिसरा हप्ता न मिळाल्याने घरकुलांचे कामे ठप्प पडलेली आहेत.
पावसाला सुरुवात झाल्याने रहाते घर पाडल्याने राहायचे कुठे असाही प्रश्न निर्माण झाला
तीन महिन्यात घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार विलंबाने काही घरकुलधारकांना दुसऱ्या अनुदानित हप्त्याची रक्कमही त्यांच्या खात्यात जमा झाली. घरकुलधारकांनी उन्हाळ्यात बांधकाम पूर्ण होण्याचे उद्दिष्ट असल्याने राहाते घर तोडून त्या जागेवर नवीन घरकुल बांधकामाला सुरुवात केली परंतु बहुतांश घरकुलधारकांना अनुदानाचा तिसरा हप्ता वेळेवर मिळाला नसल्याने व रोजगार हमी योजनेअंतर्गत अजून पर्यंत त्यांची मजुरांची मजुरी न मिळाली नाही. अशातच पावसाला सुरुवात झाल्याने रहाते घर पाडल्याने राहायचे कुठे असाही प्रश्न निर्माण झाला. बऱ्याचशा नागरिकांनी भाड्याच्या घरात आश्रयघेतला तर काहींनी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणीच आश्रय घेतला, कसे बसे स्लॅब लेवल पर्यंत घरकुलाचे बांधकाम करण्यात आले परंतु शासनाने आठ महिन्याचा कालावधी लोटूनही तिसरा अनुदानाचा हप्ता बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने घरकुलांचे कामे रखडलेत अशातच वाढत्या महागाईचा फटका घरकुलधारकांना बसत आहे.
एक लाख 50 हजारात घराचे काम महागाईमुळे पूर्णत्वास जाणे अशक्य
अनुदानाला लागत असलेला विलंब ऐन पावसाळ्यात राहण्याची सोय नाही. एक लाख 50 हजारात घराचे काम महागाईमुळे पूर्णत्वास जाणे अशक्य झाल्याने घरकुलधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोहयोअंतर्गत घरकुल कामे केलेल्या मजुरांची मजुरी ही जमा न झाल्याने मजूर वर्ग ही विवंचनेत सापडलेला आहे. शासनाने त्वरित अनुदानाचा तिसरा हप्ता घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे व रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम मजुरांची मजुरी सणासुदीच्या काळात त्यांच्या खात्यावर जमा करावी व वाढत्या महागाईमुळे एक लाख पन्नास हजारात घरकुल बनवणे शक्य नसल्याने ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना दोन लाख 50 हजार वाढवून रक्कम देण्याची मागणी घरकुल लाभा त्यांनी केलेली आहे.