संसार उपयोगी साहित्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक..!
परभणी/जिंतूर (Parbhani fire) : तालुक्यातील सावरगाव तांडा येथील शेतकरी जनार्दन दिपला पवार यांच्या सावरगाव येथील गट क्रमांक १३७ मधील राहत्या शेत आखाड्यावर दि .१५ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी ११: ४५ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमध्ये (Parbhani fire) भीषण आग लागली.
तालुक्यातील सावरगाव तांडा येथे पंधरा पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून येथील जनार्दन दिपला पवार त्यांच्या राहत्या शेत आखाड्यावर भीषण आग लागून संसार उपयोगी साहित्यसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या (Parbhani fire) आगीमध्ये शेती उपयोगी पिंककलरचा सट, नुकताच शेतातून गहू काढून आखाड्यावर ठेवलेल्या तीन बॅग, ज्वारी, नुकतेच सोयाबीन विकून मिळालेल्या ६० हजारातून उरलेले ३५ हजार रोख रक्कम, फवारा, टीव्ही, यासह सर्व वस्तू खाक झाले आहे.
जनार्दन पवार व त्यांच्या पत्नी यांच्या अंगावर परिधान केलेले कपडे मात्र शिल्लक आहे. या लागलेल्या (Parbhani fire) भीषण आगीत आग विझवण्यासाठी धडपड करणाऱ्या जनार्दन पवार व त्यांच्या पत्नी यांना आगीचे चटके लागून जखमी झाली आहे. शासन दरबारी आर्थिक मदत मिळण्याचे आवाहन जनार्दन पवार यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
