देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Assembly Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Assembly Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/05 at 7:46 PM
By Deshonnati Digital Published November 5, 2024
Share
Hingoli Assembly Election

निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांचे निर्देश

हिंगोली (Hingoli Assembly Election) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणेने चांगले नियोजन केले आहे. (Hingoli Assembly Election) निवडणूक भयमुक्त, पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी आज येथे दिले.

सारांश
निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांचे निर्देशखर्चाच्या नोंदी दररोज अद्ययावत कराव्यात-निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान

सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही पूर्णवेळ उपलब्ध-निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेशकुमार बन्सल

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज (Hingoli Assembly Election) निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खर्च निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान, पोलीस निवडणूक निरीक्षक डॉ. राकेशकुमार बन्सल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उप जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यावेळी उपस्थित होते.

श्रीमती वंदना राव म्हणाल्या की, सर्व बाबींची माहिती संबंधित पथक प्रमुख आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांनी दिली आहे. प्रत्येक मतदार संघात विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना (सुविधा कक्ष) कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक कालावधीत प्रचार करताना परवानगी घेऊनच प्रचार करावा. परवानगीशिवाय कोणताही प्रचार केल्यास व निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. यासाठी सर्व उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. (Hingoli Assembly Election) निवडणुकीच्या सर्व बाबींवर निवडणूक आयोगाच्या एफएसटी, एसएसटी व व्हीएसटी पथकाद्वारे करडी नजर राहणार आहे. उमेदवारांना किंवा त्यांच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेबाबत काही शंका असल्यास सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे भेटता येईल. आपल्या शंका, अडचणीचे निराकरण करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

खर्चाच्या नोंदी दररोज अद्ययावत कराव्यात-निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान

पोलीस निवडणूक निरीक्षक डॉ. राकेशकुमार बन्सल म्हणाले की, सर्वांना कायदा समान आहे. (Hingoli Assembly Election) हिंगोलीचा निवडणूक कालावधीतील इतिहास चांगला आहे. त्याला पुढे नेण्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी काम करावे. कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होणार यासाठी नियमाच्या चौकटीत राहून प्रचार करा, यासाठी सर्वांना सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. आपण सर्वजण योग्य समन्वयातून कामकाज पार पाडाल, असा आम्हाला विश्वास आहे. सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही येथे पूर्णवेळ उपलब्ध असून, काही तक्रार असल्यास सी-व्हीजील ॲपवर तक्रार नोंदवावी. त्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले.

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी अभिरुप नोंदवही (शॅडो रजिस्टर) दररोज अद्यावत करावे. प्रत्येक उमेदवारास 40 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेतच खर्च होईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. 10 हजारापेक्षा जास्त रोखीचे व्यवहार होणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. निवडणूक प्रचार करताना सर्व परवानग्या घेऊनच प्रचार करावा. प्रचारासाठी झालेला खर्च दररोज अभिरुप नोंदवहीमध्ये अद्यावत करावा. सर्व (Hingoli Assembly Election) विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त सहायक खर्च निरीक्षकांनी आपापल्या मतदार संघातील खर्चांच्या नोंदी अचूक तपासून ती दररोज अद्यावत करावी. उमेदवाराला काही अडचणी आल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सोडवता येतील. तसेच आपली काही तक्रार असेल तर लेखी स्वरुपात किंवा सी-व्हीजील ॲपवर द्यावी. निवडणूक आयोगामार्फत एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी पथकामार्फत रोकड, मद्य आदी वाटपावर बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश खर्चाचे निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांनी पालन करताना, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत असलेला तपशील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर निवडणूक कालावधीत 3 वेळा प्रकाशित करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी (Hingoli Assembly Election) नियुक्त निवडणूक आचारसंहिता पथकाचे प्रमुख नामदेव केंद्रे, खर्चाचे पथक प्रमुख दिगंबर माडे, परवाना कक्षाचे प्रथम प्रमुख प्रशांत बिलोलीकर यांनी आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्चाच्या बाबी, विविध परवाने याची माहिती उमेदवारांना सांगितली. या बैठकीस सर्व जिल्हास्तरीय पथक प्रमुख, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक खर्च निरीक्षक, सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Youth Suicide: बारावीला कमी गुण पडले तरुणाने केली आत्महत्या!

Dr. Jayant Narlikar: ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

TAGGED: Hingoli Assembly election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Bribery case
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Bribery case: ‘त्या’ लाचखोरांना पुन्हा न्यायालयीन कोठडी; जामीन अर्ज फेटाळला

Deshonnati Digital Deshonnati Digital May 19, 2024
Saibaba Janata Bank: रिझर्व बँकेने साईबाबा जनता सहकारी बँकेेवरील निर्बंध हटविले!
CM Ladki Bahin Yojana: ऑनलाइन अर्ज करणाऱ्या बहीण-भावांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच
Hingoli : आध्यात्मिक मार्गाने जीवन समृद्ध होते – माँ कनकेश्‍वरी देवीजी
‘अशी कधी निवडणूक असते का?’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Youth Suicide
परभणीमराठवाडा

Youth Suicide: बारावीला कमी गुण पडले तरुणाने केली आत्महत्या!

May 20, 2025
Dr. Jayant Narlikar
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Dr. Jayant Narlikar: ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

May 20, 2025
Chhagan Bhujbal
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

May 20, 2025
Wasmat Murder
हिंगोलीमराठवाडा

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

May 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?