Gadchiroli:- कोरची तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मकेंँकसा गावामध्ये शनिवारी जनसंवाद यात्रा सुरू असताना, अचानक गावातील एका लहान मुलाचा अपघात (Accident)झाल्याची माहिती मिळाली. अपघाताचे वृत्त कळताच, काँग्रेस (Congress)कार्यकर्त्या डॉ. शिलूताई चिमुरकर यांनी आपल्या जनसंवाद यात्रेला थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्वरित मदतीसाठी धाव घेतली.
स्वतः घटनास्थळी पोहोचून त्या मुलावर प्राथमिक उपचार
आरोग्य उपकेंद्र मकेँकसा येथे डॉक्टर (Doctor)उपस्थित नसल्याचे लक्षात येताच, डॉ. चिमुरकर यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून त्या मुलावर प्राथमिक उपचार केले. त्यांनी आरोग्य वाहिनीची सुविधा त्वरित उपलब्ध करून दिली आणि मुलाला अधिक चांगल्या उपचारासाठी कोरची येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. डॉ. शिलूताई चिमुरकर यांनी जनसंवाद यात्रा थांबवून तात्काळ दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे समाजात आरोग्यसेवांबद्दल जागरूकता निर्माण होत आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या या कृत्याचे कौतुक केले असून, आरोग्य सुविधांच्या अभावातही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना केल्यामुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.