कारंजा(Washim) :- दुचाकी अपघातात जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचादरम्यान मृत्यू (Death)झाला आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल एका जणाविरुद्ध येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये ३ सप्टेंबर रोजी गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचादरम्यान मृत्यू
बुद्ध जुम्मा गवळी (४२, रा.डोणगाव ता.मेहकर जि.बुलढाणा) यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी आरोपीला त्याच्या बहिणीच्या भेटीकरिता कारंजा येथे जाण्यासाठी त्यांची दुचाकी दिली होती. सदर आरोपी हा २१ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास कारंजावरून गावी परत जाताना त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळीपणाने चालवून स्थानिक आदिमाया हॉटेलसमोरील रस्त्याच्या दुभाजकाला धडकवली. या घटनेत आरोपीच्या मागे बसलेला समीर बाबू परसुवाले (२६ ,रा. शिरपूर जैन, ता.मालेगाव) याच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी ईस्माईल जुम्मा रेघीवाले (रा.डोणगाव ता.मेहकर जि.बुलढाणा) याच्याविरूध्द कलम १२५, १०६ (१) बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला आहे.