हिंगोली(Hingoli):- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police)बाबाराव माधवराव खिल्लारे ( ५५) यांचा नांदेड येथे उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यांच्यावर सोमवारी 29 जुलै रोजी दुपारी हिंगोलीच्या स्मशानभूमीत (cemetery) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंगोलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबाराव खिल्लारे हे मागील काही दिवसापासून गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी २७ जुलै रोजी सकाळी ते कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी हा प्रकार इतर सहकाऱ्यांना सांगितला. त्यांना तातडीने उपचारासाठी गोरेगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी तारीख 29 सकाळी त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह (dead body) हिंगोली येथे आणण्यात आला. त्यानंतर दुपारी हिंगोली येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते. मृतक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठी कामगिरी
परभणी येथील जिल्हा पोलीस दलात(police force) भरती झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे हे हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर हिंगोली जिल्हा पोलीस दलात दाखल झाले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले. त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठी कामगिरी बजावली. अत्यंत मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती. त्यांच्या निधनाने पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.