विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेय यांची उपस्थिती
अमरावती (Dussehra Festival) : भारतीय पारंपारीक खेळ, संस्कृती आणि अद्ययावत खेळांचे जागतिकस्तराचे गुरूकुल असलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विजयादशमी महाेत्सव मागील ९४ वर्षांपासून अमरावती शहराचा वैभवशाली सोहळा ठरला आहे. यंदाही अमरावती-बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथे आज शनिवार दि. १२ ऑक्टाेंबर ला सायं.५ वाजता विजयादशमी महाेत्सवाचे (Dussehra Festival) आयाेजन करण्यात आले आहे. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आयाेजीत या विजयादशमी महाेत्सवाला अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेय उपस्थित राहणार आहे.
भारतीय पारंपरिक खेळाचे सादरीकरण
प्रमुख अतिथीमध्ये मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, तंत्र व उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डाॅ. केशव तुपे, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व इंटरनॅशनल मल्लखांब फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी धरमवीर सिंग, मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, उपाध्यक्ष डाॅ. विकास काेळेश्वर, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, प्रा. दिपाताई कान्हेगावकर, प्रा. प्रणव चेंडके यांचेसह मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा (Dussehra Festival) विजयादशमी महाेत्सवामध्ये २२ राज्यातील ३ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सहभाग राहणार आहेत. यामध्ये डंबेल्स कवायत, मल्लखांब, रोप मल्लखांब, दंड बैठक, रायफल डील, गाेला ड्रिल, विटा फेक, भाला ड्रिल, सिंगल दांड पट्टा, डबल दांड पट्टा, दांड पट्टा ड्रिल, लेझीम, सिंगल लाठी, दाे हाती तलवार, ढाल तलवार, एराेबिक्स, याेगा ड्रिल, जिम्नाेस्टिक्स, रशियन ड्रिल, बाॅक्सींग, तायकांडाे, बाॅडी बिल्डिंग, सिंगल बनेटी, दाे हाती बनेटी, चेन बनेटी, जळती जाेडी, टाॅर्चेस मार्चिंग, लेझीम व सांस्कृतिक अशा भारतीय पारंपरिक व आधुनिक खेळाचे सादरीकरण हाेणार आहे.
या महोत्सवाचे समन्वयक डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे (Dussehra Festival) विजयादशमी महोत्सवाची जबाबदारी सांभाळत आहे. अमरावतीचा वैभवशाली विजयादशमी महाेत्सवाला समस्त अमरावतीकरांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके व मंडळाच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे.