गंगाखेड निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांची माहिती
परभणी (E- Crop Inspection) : शेतकर्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी पेरलेल्या पिकांची नोंद करणे आनिवार्य आहे. त्यासाठी प्रशासनाकडून (E- Crop Inspection) ई पिक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र शेवेटचा दिवस उजाडला तरी जिल्ह्यातील ३० टक्के शेती खात्यांची पिक पहाणी अजुन बाकीच आहे. रविवार १५ सप्टेंबर रोजी ई – पिक पाहणी करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेतकर्यांनी पिकांची नोंद करणे आवश्यक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे.
रविवार १५ सप्टेंबर अंतिम तारीख
जिल्ह्यात ५ लाख ७२ हजार ३५९ एकुण शेतकरी खातेदार असून त्यापैकी त्यापैकी ३ लाख २९ हजार २१५ शेतकर्यांनी ई – पिक पाहणी केली आहे. त्यांचे हे प्रमाण ६९.३३ टक्के आहे. म्हणजेच ३० टक्के शेतकर्यांनी अजुन हि पिकांची नोंद केलेली नाही. जिल्ह्यात ५ लाख ३४ हजार ९०० हे.क्षेत्र सर्व साधारण खरीपाचे असून त्यापैकी ४ लाख १८ हजार ९४७ क्षेत्राची पिक पाहणी झाली आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी सर्वात जास्त सोनपेठ तालुक्यातील ७६.२९ टक्के खातेदारांनी पिकांची नोंद केली आहे. तर सर्वात कमी पिकांची नोंद सेलू तालुक्यातील ६६.२५ टक्के खातेदारांनी केली आहे. या व्यतीरिक्त पालम तालुक्यात ७२.८९ टक्के, पुर्णा तालुक्यात ७१.१४ टक्के , पाथरी तालुक्यात ७१.०४ टक्के, मानवत तालुक्यात ७०.९७ टक्के, परभणी तालुक्यात ६८.९५, गंगाखेड तालुक्यात ६७.०३ टक्के, जिंतूर तालुक्यात ६६.७१ टक्के शेती खातेदारांनी पिकांची ई- पीक पाहणी केली आहे.
उर्वरित शेतकर्यांनी तात्काळ पिक पाहणी करा
जिल्हाभरात सरासरी ७० टक्के खातेदरांनी पिक पहाणी केली असून अजुन ही, शनिवार दुपार पर्यंत ३० टक्के शेतकर्यांच्या शेती खात्यांची (E- Crop Inspection) ई – पीक पाहणी बाकीच आहे. शेतकर्यांकडे स्मार्ट फोन नसणे, मोबाईलचे पुरेसे ज्ञान नसणे, त्यांच्या शेती क्षेत्रात अपुरे नेटवर्क असणे,निरक्षरता या कारणांमुळे शेतकर्यांच्या पिकांची नोंद बाकी आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून अनेक वेळा ई – पीक पाहणी ला विरोध करत कृषी अधिकार्यांमार्फत पिकांची नोंद करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने ई – पिक पहाणी स्वत:च्या स्तरावर करणे आनिवार्य केल्याने अजुन ही शेतकरी बाकीच आहेत.
राज्य शासनाच्या वतीने शेतकर्यांना (E- Crop Inspection) पीक पाहणी करण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली. या कालवधीत शेतकर्यांनी त्यांच्या शेतात पेरलेल्या सोयाबीन,मुग, उडीद, ज्वारी, कापुस, हळद सह इतर खरीप पिकांची नोंद करणे आनिवार्य करण्यात आले आहे. या वर्षी जून महिण्याच्या पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली होती. साधारणता: जून महिण्याच्या शेवट पर्यंत शेतकर्यांनी पेरणी पुर्ण केली. त्यानंतर पिकांची नोंद करण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी कार्यालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती ही करण्यात आली. त्यामुळे उर्वरीत शेतकर्यांनी तात्काळ (Crop Insurance) पीक पहाणी करावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
शेतकर्यांनो पिक पाहणी करा अन्यथा शासकीय मदती पासुन वंचित रहाल
शेतकर्यांनो शासकीय मदत मिळवण्यासाठी आपल्या शेतातील पिकांची नोंद करणे आवश्यक आहे.जर पिकांची नोंद झाली नाही, तर शासकीय अनुदान, (Crop Insurance) पिक विमा आदि मदती पासुन वंचित रहावे लागणार .