मानोरा (Washim):- महाराष्ट्रभर शासनाने लागू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) तसेच पि एम किसान सन्मान योजना यासह विविध योजनेसाठी बँक खाते अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी (E-KYC) करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ई – केवायसी प्रत्येकालाच बँकेत रांगेत उभे राहून करावे लागत आहे.
ई – केवायसी प्रत्येकालाच बँकेत रांगेत उभे राहून करावे लागत आहे
सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले असल्याने ते पैसै काढण्यासाठी सर्वच बँका, पोस्ट ऑफीस (Post Office) कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तर बऱ्याच बहिणींची ई – के वाय सी नसल्याने त्या ई – केवायसी करण्यासाठी झुंबड करत आहे. बँकेच्या मर्यादीत वेळेत अनेक महीलांची ई केवायसी होत नसल्याने त्यांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. स्टेट बँक शाखा मानोरा येथे सर्वाधिक महिलांची (Womens)ई – के वायसी साठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे बँकेची अपुरी व्यवस्था असल्याने महिलांना रस्त्यावर सकाळी ६ वाजता पासून रांगेत उभे राहावे लागत आहे. खरे म्हणजे बँकेतील कर्मचारी केवळ बँकेचा वेळ साधून संथ गतीने कामे करीत असल्याने अनेक बहिणींना केवायसी विना खाली हात आर्थिक भुर्दंड सहन करत घरी परतावे लागत आहे. त्यामुळे या बाबीकडे जिल्हाधिकारी व बँकेचे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून लाडक्या बहिणींची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी महीला बहिणीकडून होत आहे.