गोंदिया (E-KYC Online) : जिल्ह्यातील शेतकर्यांना (PM Kisan Yojana) पीएम किसान योजना व राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा लाभ दिला जातो. या योजनांच्या लाभासाठी शेतकर्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (E-KYC) ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकर्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. यामुळे (Agriculture Department) कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सुचना देवून शेतकर्यांना आवाहन केले जाते. यानुरूप जिल्ह्यात २ लाख १८ हजार ७१९ शेतकरी असून यापैकी २ लाख १७ हजार ५२० शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. (E-KYC) ई-केवायसी पूर्ण करण्यामध्ये गोंदिया तालुक्यातील शेतकरी अग्रेसर आहेत.
अद्यापही अनेक शेतकर्यांचे केवायसी करणे शिल्लक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ शेतकर्यांना देण्यात येत आहे. त्यात भर घालत राज्य शासनाने शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थीच्या खात्यात वर्ग केले जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनानेदेखील नमो महासन्मान योजना सुरू केली. त्यामुळे दोन्ही योजनांच्या मिळून पात्र शेतकर्यांना वर्षाकाठी १२ हजार मिळू लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना दिलासा मिळत आहे. योजनेचा लाभ खर्या आणि पात्र शेतकर्यांनाच मिळावा, यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकर्यांना (E-KYC) ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. केवायसी करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी अजूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.
चौथा हप्ता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर मिळणार
जिल्ह्यात २ लाख १८ हजार ७१९ शेतकरी असून यामध्ये आमगाव तालुक्यात २४१२९, अर्जुनी मोरगाव २६३०५, देवरी १७९२२, गोंदिया ४७७८१, गोरेगाव २४६९४, सडक अर्जुनी २४५४९, सालेकसा १६२७४, तिरोडा ३७०६३ शेतकर्यांचा समावेश आहे. यापैकी २ लाख १७ हजार ५२० शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केले आहे. तर अद्यापही अनेक शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिल्लक राहिले आहेत. (PM Kisan Yojana) पीएम किसान योजनेचा १८ वा, राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर जून अखेरीस किंवा जुलै महिन्यांत मिळणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या एकूण चार हजारांसाठी शेतकर्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. म्हणून शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन (Agriculture Department) कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
११९९ शेतकर्यांची ई-केवायसी प्रलंबित
पीएम किसान योजनेचा १८ वा आणि नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात पात्र शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यात २ लाख १८ हजार ७१९ शेतकरी असून यापैकी २ लाख १७ हजार ५२० शेतकर्यांनी (E-KYC) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केले आहे. तर ११९९ शेतकर्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित राहिले आहे. आगामी हप्त्यापूर्वी केवायसी पूर्ण न केल्यास अशा शेतकर्यांना दोन्ही हप्त्यांच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे.
केवायसी (E-KYC) आणि आधार सीडिंग न केलेल्या शेतकर्यांची गावनिहाय यादी (Agriculture Department) कृषी विभागाकडून यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत जनजागृतीसह संबंधितांना कळविण्यात आले. ज्या शेतकर्यांनी अजूनही केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण केले नसेल, त्यांनी तत्काळ ही प्रकिया पूर्ण करून घ्यावी.
– हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी