तहसील कार्यालयावर रेशन दुकानदारकडून तहसीलदारांना निवेदन
अर्जुनी मोर (E-machine) : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांवर मागील काही दिवसांपासून (E-machine) ई – पॉज मशीन सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटप करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या सूचनेनुसार संघटनेने (E-machine) ई – पॉज मशीन जमा करुन घेतली.
राज्यात साधारण 54 हजार धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या या संगणकी करणानंतर 2018 ई -पास द्वारे धान्य वितरण करतात तद्वत नंतर काल बाह्य झालेल्या 2जी ईपास मशीन द्वारे धान्य वितरण करीत आहेत. धान्य वाटप अत्याधुनिक 4जी सपोर्ट ई -पास मशीन देण्यासंदर्भात दोन वर्ष आंदोलन मोर्चे काढल्यानंतर (E-machine) ई पास मशीन पेक्षा जुनी टू जी चांगली होती म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महिन्यापासून ई पास मशीन (E-machine) वर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना भर पावसात भिजत येऊन धान्यासाठी तात्काळत राहावे लागते व रिकाम्या हाताने परत जावे लागतात. त्यावेळी शिवीगाळ व धक्काबुक्की धान्यविक्रेत्या दुकानदारांना सहन करावा लागेतो राज्यातील धान्य दुकानदारांकडे धान्याचा साठा असून वितरण करण्यासाठी तालुका स्तरापासून अनेक तक्रारी देऊन सकारात्मक उपाययोजना न झाल्याने त्याची दखल आज 5 ऑगस्ट 2024 ला (Tehsil office) तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांनी (E-machine) ई-मशीन तहसील कार्यालयात अर्जुनी मोर येथे वापस केली.
याप्रसंगी दिलीप जैन ,अभय फुल्लके, दादाजी शेलोकर, चंपालाल पालीवाल, बाबुराव भोयर, सुगंधा नाकाडे, मीना गावड ,चंदू खुणे दिलीप मेश्राम श्रीदान पालीवाल ,सुभाष देशमुख, ललिता सोनवणे, लक्ष्मण नाकाडे, दीनदयाळ रहिले, विद्या बारसागडे, हेमराज भेडारकर इत्यादी तालुक्यातील राशन दुकानदार उपस्थित होते