परभणी (Parbhani):- इलेक्ट्रीक वाहन खरेदीला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असले तरी हे वाहन खरेदीचे प्रमाण अद्यापही कमी आहे. ई – वाहन चार्जिंग कुठे करावे हा मोठा प्रश्न वाहनधारकांसमोर असतो. यावर महावितरणने आता उपाय काढला आहे. महावितरण कंपनी मागेल त्याला चार्जिंग स्टेशन (Charging station) सुरू करण्यासाठी वीज जोडणी देणार आहे. परभणी जिल्ह्यात चार्जिंग स्टेशनसाठी १९ जणांनी प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी ५ चार्जिंग स्टेशन सुरू झाले असून १४ चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती महावितरणकडून(distribution) देण्यात आली आहे.
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात ८६ चार्जिंग स्टेशन सुरू
महावितरणकडून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात ८६ चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहेत. पर्यावरणपुरक आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. केंद्र शासनाने(Central Govt) इलेक्ट्रीक चार्जिंग इको सिस्टम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोलपंप किंवा शॉपिंग मॉल जवळ कोणीही चार्जिंग स्टेशन सुरू करु शकतो. महामार्गाच्या बाजुला इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. राज्यशासनाने पायाभुत सुविधा पुरविण्याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (Electricity distribution) कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. खाजगी चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास महावितरणतर्फे प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे.
महावितरणचे पॉवर अॅप
इलेक्ट्रीक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती तसेच भौगोलिक निर्देशांकांची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने पॉवर अॅप नावाचे मोबाईल अॅप विकसीत केले आहे. चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती उपलब्ध वेळ, वाहनापासून असलेले अंतर आदींची माहिती या अॅपद्वारे ई – वाहन वापरणार्या वाहनधारकांना मिळणार आहे.
प्रदुषण कमी करण्यासाठी ई – वाहन
मागील काही ई – वाहन वापरणार्यांचे प्रमाण वाढत आहे. या वाहनामुळे प्रदुषणाची समस्या देखील कमी होते. ई – वाहनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. येत्या काळात या वाहनांचा वापर अधिक वाढेल. दुचाकीबरोबर मालवाहतुकीची लहान वाहने देखील इलेक्ट्रीकमध्ये आली आहेत.