Myanmar Earthquake :- शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर (Earthquake) शनिवारीही तेथे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कालच्या आपत्तीत १००० हून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाला आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला.
विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण
शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या ७.७ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या सतत वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, जखमींची संख्या २४०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शनिवारीही म्यानमारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला. शनिवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर म्यानमारच्या विविध भागात ढिगारे दिसत आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.




