नवी दिल्ली (Earthquake) : सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake) भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 मोजण्यात आली. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, आज सोमवारी सकाळी 5.36 वाजता भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू धौला कुआनजवळ होता. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादसह अनेक भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के खूप तीव्र होते, त्यामुळे लोक घराबाहेर पडले. तथापि, अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के
अहवालानुसार, दिल्लीसह इतर अनेक राज्यांमध्ये (Earthquake) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, सहारनपूर, मथुरा आणि आग्रा यासारख्या अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील कुरुक्षेत्र, हिसार आणि कैथल येथील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले.
#WATCH | A 4.0-magnitude earthquake jolted the national capital and surrounding areas | A passenger awaiting his train at New Delhi railway station says, "I was in the waiting lounge. All rushed out from there. It felt as if some bridge had collapsed…" pic.twitter.com/I5AIi31ZOd
— ANI (@ANI) February 17, 2025
दिल्ली पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जारी
दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपानंतर, (Delhi Police) दिल्ली पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि एक हेल्पलाइन नंबर जारी केला. (Earthquake) कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोक 112 क्रमांकावर संपर्क साधू शकतात. (Delhi Police) पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका, असा सल्ला दिला आहे.
#WATCH | A 4.0-magnitude earthquake jolted the national capital and surrounding areas | A resident of Ghaziabad says, "Tremors were so strong. I have never felt like this ever before. The entire building was shaking…" pic.twitter.com/e2DoZNpuGx
— ANI (@ANI) February 17, 2025
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
भूकंपानंतर लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि सांगितले की, (Earthquake) भूकंप खूप तीव्र होते आणि त्यांना भीती वाटली. काही लोकांनी असेही म्हटले की, भूकंपामुळे त्यांच्या घरात ठेवलेल्या वस्तू हलू लागल्या. (Delhi Police) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आपल्या ट्रेनची वाट पाहणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले, “मी वेटिंग लाउंजमध्ये होतो. सर्वजण तिथून पळून गेले. जणू काही पूल कोसळल्यासारखे वाटले.”