गडचिरोली (Gadchiroli):- जिल्ह्यातील अनेक भागात आज 4 डिसेंबर रोजी सकाळी 7.26 मिनिटांनी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. यावेळी अनेकांच्या घरातील खिडक्या हलल्या तर काहींच्या घरातील भांडे देखील खाली पडले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर पडत मोकळ्या मैदानात धाव घेतली.
भूकंपाचे केंद्रबिंदू हे तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे असल्याची माहिती असून भूकंपाची तीव्रता 5.3 रेस्टर स्केल आहे.नागरिकांनी उचित काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
