लातूर (Latur):- औसा तालुक्यातील आलमला येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी (Cemetery) राज्यसभेचे सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी २० लाखांचा निधी मंजूर केला. आलमला येथे सोमवारी डॉक्टर गोखले यांचे ग्रामस्थांच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे निधीची मागणी करताच त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला.
डॉक्टर गोखले यांचे ग्रामस्थांच्यावतीने जोरदार स्वागत
खा. डाॕ. अजित गोपछडे सोमवारी आलमला येथे आले असता आलमला गावातील भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) कार्यकर्ते औसा तालुका भाजपाचे सचिव कमलेश निलंगेकर, भाजपाचे औसा तालुका अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष दौलत वाघमारे, औसा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते शिवानंद धाराशिवे, औसा तालुका भाजपा (BJP)युवाचे सदस्य रामेश्वर पाटील, ओबीसी नेते शिवाजी कुंभार, प्रभाकर कापसे व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सोबतच लातूर भाजपा विधानसभा संयोजक अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी आलमला गावच्या लिंगायत स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी 20 लाखांच्या खासदार निधीची मागणी करण्यात आली. खा. डाॕ. गोपछडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून लगेचच मंजुरी दिली. खा. डाॕ. गोपछडे यांच्या या निर्णयाचे आलमला ग्रामस्थांतून जोरदार स्वागत होत आहे.