बाळापूर(Hingoli):- जिल्हा हिंगोली तरूणीचे फोटो एडिट करून इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड करून तरूणीची बदनामी (Defamation) करणार्या तरूणा विरूद्ध सोमवारी रात्री आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात आयटी अक्टसह विनयभंगाचा गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी आखाडा बाळापूर येथील १९ वर्षीय तरूणीच्या इन्स्टाग्रामवर १७ एप्रिल २०२४ ते २५ मे दरम्यान एका तरुणाने एका इन्स्टाग्राम आयडीवरून संपर्क साधून जवळीकता साधण्याचा प्रयत्न करून अश्लील फोटो (pornographic photos) एडिट करून त्याला सदर तरूणीचा चेहरा लाउन सदर फोटो व इतर अश्लील फोटो तरूणीच्या इन्स्टाग्रामवर टाकून सदर तरूणीचा छुपा पिछा केला. फिर्यादी तरूणीच्या मनास लज्जा वाटेल अशी चॅटिंग व फोटो टाकून बदनामी होईल या उद्देशाने व त्याने सांगितल्या प्रमाणे तरुणीने प्रतीसाद दिला नसल्याने सदर तरूणीचा चेहरा अश्लील फोटोला जोडून इडीटींग करून सदर फोटो तरूणी व तिच्या भावाच्या मोबाईलवर टाकले. अशा आशयाची फिर्याद सदर तरूणीने आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात दिल्याने गौरव शुक्राचार्य बनसोडे रा.हिवळेश्वर ता.आर्णी जिल्हा यवतमाळ विरुद्ध विनयभंग तसेच आयटी अक्टनुसार(IT Act) गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करत आहेत.