आकस्मिक भेटीद्वारे ‘ईओं’ कडून शाळांची तपासणी, सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Badlapur Harassment Case) : गत काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थिनींशी घडलेल्या प्रकारानंतर समाजमन सुन्न असून सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यावर शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शिवाय त्याची तपासणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून खुद्द माध्यमिक शिक्षणाधिकारी (ईओ) रोहिणी कुंभार यांच्या नेतृत्वातील पथकाने आकस्मिकरित्या शाळांना भेटी देऊन तपासणीला सुरुवात केली आहे. ज्या शाळांमध्ये या (Education department) भौतिक सुविधा किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांनात्या तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात येत आहे.
कोलकाता येथील प्रकरण ताजे असतानाच (Badlapur Harassment Case) बदलापूर येथील शाळेत घटना घडल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. त्यामुळे शासनाने सर्व माध्यमांच्या शाळांना आगामी महिन्याभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधाही उपलब्ध करण्याचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर कुंभार यांच्या नेतृत्वातील पथकाकडून विद्यार्थी सुरक्षेच्या हितार्थ शाळांना आकस्मिक भेटी देऊन भौतिक सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थी दक्षता समिती, सखी सावित्री समिती, शालेय तक्रारपेटी, परिवहन समिती आदींची तपासणी करण्यात येत आहे.
दररोज कुंभार यांच्या नेतृत्वातील (Education department) शिक्षण विभागाचे पथक आकस्मिकरित्या शाळांना भेटी देऊन याची तपासणी करीत आहेत. ज्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नाहीत, तिथे तातडीने सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येत आहे. ज्या (Badlapur Harassment Case) शाळांमध्ये भौतिक सुविधा तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून येत आहे. अशा शाळांना तातडीने या उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या सूचना देत अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
स्कूल व्हॅनचालक काढतात पळ
शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅनचा प्रश्न गंभीर असून त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त (Badlapur Harassment Case) विद्यार्थी बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग रस्त्यावर उतरला असून ‘ऑन दी रोड’ या स्कूल व्हॅनची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार कार्यालयीन दिवसांशिवाय शनिवारच्या दिवशीही (Education department) शिक्षण विभागाकडून ऑन रोड स्कूल बस, व्हॅन, ऑटोंना वाटेत रोखून तपासणी करण्यात येत आहे. मात्र अनेक स्कूल व्हॅन चालकांनी पथक दिसताच पळ काढल्याचे सांगितले जात आहे. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळून येणाऱ्या व्हॅन, बस, ऑटोंचे फोटो काढून चालकांना तंबी देत शाळांना नोटीस देण्यात येत आहे.