अर्जुनी मोर (Education Department) : शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरण व वाढती महागाई यामुळे खेड्यापाड्यातील गोरगरीब, होतकरू व हुशार विद्यार्थी चांगल्या व दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना आधार मिळावा, त्यांनाही श्रीमंत मुलाप्रमाणे चांगले शिक्षण मिळावे. याकरिता डॉक्टर भारत लाडे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. या (Education division) उपक्रमांतर्गत डॉक्टर भारत लाडे मागील 13 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च ते स्वतः करतात.
यात आणखी भर म्हणून मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण यांच्या पुढाकाराने पंचशील विद्यालय बाराभाटी या शाळेत 26 जानेवारी 2024 रोजी स्नेहसंमेलन अध्यक्षीय भाषणाच्या प्रसंगी डॉक्टर भारत लाडे यांनी शाळेतील होतकरू व हुशार विद्यार्थी म्हणून वैभव उमेश साखरे या विद्यार्थ्यांचे दहावीनंतरचे शिक्षण तसेच पुढे उच्च शिक्षणावर होणारा संपूर्ण खर्च स्वतः करण्याचे जाहीर केले होते. या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये 91.20 टक्के प्राप्त करून सर्वांचे मन जिंकले. डॉक्टर भारत लाडे यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच या विद्यार्थ्यांची अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नामवंत सरस्वती विद्यालयात अकरावी साठी ऍडमिशन करून दिली. तसेच भविष्यात उच्च शिक्षणा वर होणारा संपूर्ण खर्च करणार असल्याचे सांगितले.
याबद्दल दिनांक 24/07/ 2024पंचशील विद्यालय बाराभाटी या शाळेतील मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे कुटुंबीय यांनी डॉक्टर भारत लाडे यांचे विशेष आभार मानले. शैक्षणिक क्षेत्रातील वाढीव महागाई तसेच हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे खेड्यापाड्यातील अनेक होतकरू व गोरगरीब विद्यार्थी चांगले दर्जेदार व उच्च शिक्षण यापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना आधार देऊन शैक्षणिक मदत करणे हीच खरी समाजसेवा या संकल्पनेतून डॉक्टर भारत लाडे यांनी सुरू केलेले अभिनव उपक्रम यामुळे परिसरातील अनेक गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे. म्हणून ही समाजसेवाच नसून फार मोठी देशसेवा असल्याचे सगळीकडे चर्चा आहे.