देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Educational Activity) : ग्रामीण परिसरात देखील आता महानगरीय पठडीतल्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मेरा खुर्द येथील देशमुख परिवाराने व्यवसायिक धर्तीवर मंगलकार्यालयाची उभारणी करतांना या पंचक्रोशीतील इंग्रजी शिक्षणाची तजवीज केली,ब्राईट फ़िवचर इंग्लिश स्कुलची महूर्तमेढ देशमुख परिवाराची स्तुत्य कामगिरी आहे, असे प्रशंसनीय प्रतिपादन प्रख्यात कवी व विचारवंत अजीम नवाज राही (Azim Nawaz Rahi) यांनी केले.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील ब्राईट फ्युचर इंग्लिश स्कूल मध्ये देशमुख लॉन्ससच्या मुख्यकार्यालयात प्रख्यात मराठी कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या अध्यक्षते खाली बुलढाणा अर्बन संस्थेचे सर्वेसर्वा भाईजी राधेश्याम चांडक यांच्या सदिच्छापर आगमना निमित्त एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला होता. त्यामुळे संस्थेचा वतीने, भाईजी राधेश्याम चांडक यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन ब्राईट फ़िवचर इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष फारूक अहेमद देशमुख यांनी सत्कार केला,तसेच अजीम नवाज राही यांनी आपल्या मनोगताच्या माध्यामातून देशमुख परिवाराच्या सामाजिक शैक्षणिक,सांस्कृतिक उपक्रमांची मांडणी केली.
अजीम नवाज राही (Azim Nawaz Rahi) म्हणाले की, सुबत्तापूर्ण आर्थिक पार्श्वभूमी लाभल्याने देशमुख परिवार चाकोरीबद्ध जगणे जगू शकला असता पण कतार येथे वास्तव्याला असलेले फारूक अहेमद देशमुख यांचे वडील रियाज अहेमद देशमुख यांनी मेरा खुर्द आणि परिसराची इंग्लिश शिक्षणाची अडचण गांभीर्याने घेतली. (Educational Activity) ग्रामीण विध्यार्थ्यांना इंग्रजीत शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना लगतच्या शहरात शिक्षणासाठी जावं लागत होतं. ज्यांची आर्थिकस्थिती मजबूत होती तेच पालक आपल्या पाल्यांना मेरा खुर्दलगतच्या शहरात शिक्षणासाठी पाठवत होते,ज्या पालकांची परिस्थिती बेताची होती त्या पालकांचे पाल्य इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहत होते. ब्राईट फ़िवचर इंग्लिश स्कुलमुळे गरीब पाल्यांसाठी इंग्रजी शिक्षणाच्या अरुंद वाटा प्रशस्त झाल्या याचे श्रेय देशमुख परिवाराला जाते,गत 8 वर्षांपासून ब्राईट फ़िवचर इंग्लिश स्कुलची दिमाखदापणे वाटचाल सुरू आहे. प्रास्ताविक रिजवान अहेमद देशमुख तर संचालन प्राचार्य इमरान अहेमद देशमुख यांनी केले.