पाथरी (Pathari Educational) : परभणी/पाथरी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या (Pathari Educational) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्रे घेण्यासाठी सीएससी केंद्रावर अर्ज केल्यानंतरही पंधरा दिवसापासून सर्वर डाऊन असल्याचे कारण सांगत, आवश्यक असणारी प्रमाणपत्र मिळत नसल्याने एकीकडे विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज करणे थांबलेले असताना पालकांना सीएससी केंद्रासह तहसीलच्या खेट्या माराव्या लागत आहेत. महसूल प्रशासनाला याचे मात्र गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल
जाहीर झाल्यानंतर विविध पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा दिलेले विद्यार्थी ऑनलाइन (Maha online) अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी उत्पन्न प्रमाणपत्र ,अधिवास प्रमाणपत्र ,शेतकरी प्रमाणपत्र . भूमिहीन प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांसाठी (Pathari Tahsil) तहसील कार्यालयाकडे अर्ज करत आहेत . परंतु मागील पंधरा दिवसापासून सीएससी महा ऑनलाईन चे सर्वर डाउन असल्याचे कारण देत मागणी करण्यात आलेली सर्वच प्रमाणपत्रे अडकून पडली असून पालक व विद्यार्थ्यांची घालमेल होत आहे .
शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्रे पंधरा दिवसापासून मिळेनात
१५ जुलैपर्यंत कृषी पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे . त्यासाठी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्राची आवश्यकता पडत आहे . सर्व्हर डाऊन (server down) असल्याने ही प्रमाणपत्रे निघण्याची अडचण झाली आहे .पर्यायी व्यवस्था म्हणून हार्डवेअर सिक्युरिटी मॉडल (एचएसएम ) या प्रणालीवर थंब देऊन एकाच वेळी अनेक प्रमाणपत्रे यांना मान्यता देण्याचे प्रशासनाकडून काम चालू असूनही यामध्ये तांत्रिक अडचणी सुरू आहेत.
पालकांच्या सीएससी केंद्रासह तहसीलमध्ये खेट्या
अर्जदारांच्या मते काही सी एस सी केंद्रावरील केलेले अर्ज तात्काळ मिळत असून काही केंद्रांवर अर्जदारांना ताटकळत ठेवले जात आहे . एकंदरीत महसूल प्रशासनाकडून सर्वर डाऊन असल्याचे सांगितले जात असले तरी काही सेवा केंद्रावर प्रमाणपत्र कसे मिळत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Educational access) मागील काही दिवसापासून सर्वर डाऊन असल्यामुळे प्रमाणपत्रे देण्यास अडचण आहे परंतु एचएसएम प्रणालीवर ट्रायल चालू असून या पद्धतीने एकाच वेळी अनेक प्रमाणपत्रे देता येणे सुलभ होणार आहे .सध्या प्रयत्न चालू आहेत.
– भराडे, नायब तहसीलदार