Eknath Shinde:- महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा प्रयत्नशील होते. २०२२पासून दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळीक शिंदेंसाठी आशादायक होती. शिंदेंनी त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले होते, मात्र, भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजप श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नव्हता , दिल्लीत झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने शिंदे यांना स्पष्टपणे तसे कळवले होते.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का..?
त्यावर बुधवारी म्हणजेच काल शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यात आज शपथविधीचा दिवस. राज्याला आज नवं सरकार मिळणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)शपथ घेणार असले तरीही इतर मंत्र्यांबाबतची भूमिका सस्पेन्स आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांतच चित्र स्पष्ट होईल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे, अवघ्या एक तासात शिंदे आपला निर्णय देतील असं शिंदे गटाचे नेते उदय सामंत(Uday samant)यांनी सांगितलं आहे