परभणी/पाथरी (Parbhani):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) आणि आ.राजेश टोपेंनी जरांगेंना रसद पुरवली असल्याचा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीयवादी असल्याचे वक्तव्य ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी पाथरी येथे आयोजित सभेमध्ये केले आहे.
ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा संपन्न
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा ४थ्या दिवशी बीड जिल्ह्यातुन गुरुवार २५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पाथरी येथे आली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग (National Highway)६१ वरील सोनपेठ टि पाँईट येथुन रॅली काढून तालुक्यातील सकल ओबीसी (OBC)समाजाच्या वतीने यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान सेलू कॉर्नर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याचठिकाणी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना क्रेन(Crane) च्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालण्यात आला. पुढे अंजली मंगल कार्यालयात संध्याकाळी ९ वा. सुमारास जाहीर सभा झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रल्हादराव चिंचाणे यांनी तर तुकाराम राठोड, उद्धव महाराज श्रावणे, विश्वनाथ थोरे , राजश्री लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना नवनाथ वाघमारे पुढे म्हणाले की, जरांगे यांच्या उपोषणाच्या दबावाला राज्य सरकार(State Govt) बळी पडले आहे. जरांगे उपोषणाला बसल्यावर मंत्रिमंडळ अंतरवाली सराटीमध्ये लोटांगण घेते अशी टिका त्यांनी राज्यसरकार वर केली.