नागपूर/मुंबई (Chandrasekhar Bawankule) : महाराष्ट्राच्या राजकारणात वरचढ सुरूच असून, आज शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाचा दावा सोडण्याचे स्पष्ट केले. या भूमिकेचे समर्थन करत नागपुरात पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ‘शिंदेंची भूमिका राज्याला पुढे नेणारी आहे’, असे वक्तव्य केले.
VIDEO | Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule (@cbawankule) addresses a press conference in Nagpur.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/4sAzVwiPqV
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2024
पुढे बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, शिंदेंनी राज्यासाठी अनेक कामे केली. मराठा आरक्षण, समाजाचे घटक, प्रकल्प, महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सारखा कणखर सीएम आम्हाला लाभला. एकनाथांच्या भूमिकेवर अभिमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आमची लढाई 14 कोटी जनतेच्या विकासासाठी आहे. एकनाथ शिंदेंनी महायुतिला मजबूत करण्याचे काम केले आहे. केंद्रीय नेतृत्व जे मान्य करेल, तोच योग्य निर्णय असेल. असे म्हणत (Chandrasekhar Bawankule) बावनकुळेंनी परिषदेत पुन्हा एकदा शिंदेंच्या भूमिकेचे अभिनंदन केले.