मुंबई (Maharashtra Health Yojana) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांना मोठी भेट दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान (MJPJAY) चा लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. शिंदे सरकारने सर्वांसाठी MJPJAY लागू करण्याची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान (MJPJAY) वार्षिक प्रीमियम 60% ने वाढून 3,000 कोटींहून अधिक झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी ‘खूशखबर’; सरकार देणार वार्षिक 12,000 रुपये
या (Maharashtra Health Yojana) योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना 1 जुलैपासून लागू होणार आहे. या नवीन आरोग्य विमा योजनेद्वारे महाराष्ट्रातील लोकांना आता 1.5 लाखांऐवजी 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. ही (Health Yojana) योजना 2012 मध्ये सुरू झाली होती, जी आता विस्तारित करण्यात आली आहे.
मुलीच्या जन्मावर मिळणार ’50 हजार रुपये’
यापूर्वी या (Maharashtra Health Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी विमाधारकाला रेशनकार्ड आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने हे बंधन काढून टाकले आहे. MJPJAY 2.0 प्रत्येक राज्यातील रहिवाशांना आता फक्त वैध रेशन कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रति कुटुंब कव्हरेज रक्कम 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. शिंदे सरकारची मोठी घोषणा; 1.6 लाखापर्यंत कर्ज माफ?