मुंबई(Mumbai) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. आज सकाळी ठाणे येथून अधिवेशनासाठी (convention) निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात (Accident)झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे गेले
मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे गेले. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच आपल्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स (Ambulance) आणि आपला अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल या महिलेने त्यांचे आभार मानले. पण त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री (Chief Minister) ही छबी पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाली आहे.