आरोपी अटक, हत्याचा गुन्हा दाखल
कन्हान (Nagpur Murder Case) : पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर सहा येथे घरगुती वादातुन दारुड्या मुलाने वृद्ध आईला मारहाण केली. यात वृद्ध आईचा मृत्यु झाल्याने (Kanhan Police Station) पोलीसांनी आरोपी मुलगा रितेश ऊर्फ सोनु जगन शेंडे याला अटक करुन त्याचा विरुद्ध हत्याचा (Nagpur Murder Case) गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रा कडुन प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सौ. रिकु मूकेश मेश्राम वय ३५ वर्ष रा. प्रगती नगर सुपर टाउन कन्हान यांची आई मृतक ग.भा. मनोरमा जगन शेंडे वय ६० वर्ष ही कोळसा खदान नं. ६ येथे तिचा लहान भाऊ रीतेश उर्फ सोनु जगन शेंडे वय ३२ वर्ष. याचे सोबत राहत होती. रिकुच्या आईचे घरा शेजारी राहणा-या मावशी मंगला अशोक कांबळे हीची प्रकृती ठीक नसल्याने ती मागील दिड महिन्या पासुन आईकडे येऊन मावशीचे घरी राहत आहे. रिकुचा लहान भाऊ रितेश याचे लग्न झाले असुन त्याला एक मूलगा आणि एक मूलगी आहे. (Nagpur Murder Case) तो मजुरीचे काम करतो. भाऊ अगोदर पासुन दारू पीण्याचा सवयीचा आहे.
मागील ६ महिन्या पासुन रितेशची पत्नी त्याला आणि मुलांना सोडुन गेली. भाऊ रीतेश आईला दारू पीणेसाठी पैसा आणुन दे. “हा घर माझ्या नावाने करून दे”, असे म्हणुन नेहमी मारहाण करित होता. शनिवार (दि.१५) फेब्रुवारीला रात्री ११ वाजता दरम्यान रिकु मावशीचे घरी आराम करित असतांना तिला आईचा ओरडण्याचा आवाज आला. ती बाहेर आली तर तिचा लहान भाऊ रीतेश लाथा बुक्यानी आईला मारहाण करित होता. माझे बायकोला आणुन दे, तुझ्यामुळे ती पळाली असे म्हणत होता. रीकुने आईला भावाचे तावडीतुन सोडवुन कन्हान पोलीस स्टेशन (Kanhan Police Station) येथे तक्रार देण्यास आली. पोलीसांनी आईची तक्रार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे मेडीकल करिता पाठ विले. डॉक्टरांनी आईचा उपचार करून आईला औषध दिली आणि मेयो रूग्णालय नागपुर येथे पूढील उपचाराकरिता जाण्यास सांगितले होते. परंतु आईने रिकु ला ठीक वाटत आहे. घरी घेवुन चल, उद्याला दवाखा न्यात जाईल असे म्हटल्याने रिकु आईला रात्री ३ वाजता घरी घेऊन गेली. (Nagpur Murder Case) आईला घरी झोपविले आणि रिकु बाजुला मावशीचे घरी झोपली.
रविवारला सकाळी ७ वाजता आईने रिकुला आवाज दिला. रिकु आईकडे गेली, तर आई ने दवाखान्यात घेवुन चल पोटात खूप दुखत आहे. छात्यामध्ये दुखन आल आहे. अशी आई म्हणत होती. रिकु आजु बाजुचे लोकांना बोलाविले आईला दवाखान्यात घेवुन जाण्यासाठी ऑटो पाहायला गेली. ऑटो भेटला नाही म्हणुन रिकु ८.३० वाजता घरी परत आली. (Nagpur Murder Case) घरी आजु बाजुचे लोक जमलेले होते. लोकांनी आईला तपासुन पाहिले व आई मरण पावल्यांचे सांगितले. लहान भावाने आईच्या पोटावर, कमरेवर, लाथा-बुक्या नी मारहाण केली. तिला खाली पाडल्याने ती जख्मी झाली व तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी कन्हान पोली सांनी रिकु मेश्राम यांचा तक्रारी वरून आरोपी रितेश ऊर्फ सोनु जगन शेंडे याला अटक करून त्याचे विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात (Kanhan Police Station) कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.