पुसद (Pusad Bank Fraud) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बियाणी कॉम्प्लेक्स मधील महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया (Bank Fraud) या ठिकाणी वयोवृद्ध महिला श्रीमती लक्ष्मीबाई नारायण चिरमाडे वय 74 रा. चिलवाडी सदर महिला दि. 13 सप्टेंबर च्या 11ते दुपारी दोन वाजे पर्यंत बँकेमध्ये च्या खात्यामध्ये दहा हजार रुपये टाकण्यासाठी गेली होती. सदर महिला ही घरकाम करीत असून वयोवृद्ध आहे. कमरेचे ऑपरेशन झाल्यामुळे रॉड बसविण्यात आलेला आहे.
सदर महिला अशिक्षित असल्यामुळे बँकेमध्ये (Bank Fraud) मोठी गर्दी असताना एका अनोळखी तरुणास त्या महिलेने दहा हजार रुपयाची स्लिप भरून मागितली व ती खात्यात टाकण्याचे सांगितले. सदर अज्ञात भामट्याने खोटी स्लिप भरून त्यावर दोन हजार रुपयाची रक्कम टाकली व त्याच महिलेचा अंगठा घेतला आणि ती तिला दिली. सदर महिलेने बँकेच्या अकाउंटंट ला विचारले की, माझ्या खात्यामध्ये सदर दहा हजाराची रक्कम जमा झाली का? तर त्यांनी नाही असे सांगितले. अज्ञात भामट्याने सदर महिलेची फसवणूक केल्याची बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठले ठाणेदार यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.
ठाणेदार उमेश बेसकर यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना (Bank Fraud) बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले. या संदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.
वयोवृद्ध नागरिकांनी केचे किंवा आर्थिक व्यवहार करीत असताना आपल्या ओळखीच्या किंवा नातेवाईकांच्या सोबतीने ते करावेत. असे अनोळखी इसमानवर विश्वास ठेवू नये आपली आर्थिक फसवणूक (Bank Fraud) होण्याची शक्यता जास्त असते. यासंदर्भात वयोवृद्ध नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
– ठाणेदार उमेश बेसरकर शहर पोलीस स्टेशन