नवी दिल्ली/मुम्बई (Election 2024) : लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाबाबत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 56.68 टक्के मतदान झाले. (Election Commission) निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पाचव्या टप्प्यात सरासरी मतदानाचा आकडा 60 टक्क्यांपेक्षा कमी होता. यादरम्यान, काही बूथवर तुरळक हिंसाचार आणि हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदानांतर्गत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या जागांवर मतदान झाले. राहुल गांधी, भाजप नेते राजनाथ सिंह, स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी, पीयूष गोयल, उज्ज्वल निकम, करण भूषण सिंग, लोजप (रामविलास) प्रमुख चिराग पासवान, जेकेएनसी प्रमुख ओमर अब्दुल्ला आणि आरजेडी नेते यांसारख्या नेत्यांच्या जागांवर मतदान झाले.
पाचव्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी:
निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, (LokSabha Election) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 57.47% मतदान झाले.
राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
बिहार- 52.60%
जम्मू आणि काश्मीर – 54.49%
झारखंड- 63.00%
लडाख-67.15%
महाराष्ट्र- 48.88%
ओडिशा- 60.72%
उत्तर प्रदेश – 57.79%
पश्चिम बंगाल- 73.00%
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आकडेवारीनुसार
लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) पाचव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.68 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये 73 टक्के मतदान झाले. यानंतर लडाखमध्ये 67.15 टक्के, झारखंडमध्ये 61.90 टक्के, ओडिशामध्ये 60.55 टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये 55.80 टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये 54.21 टक्के, बिहारमध्ये 52.35 टक्के आणि महाराष्ट्रात 48.66 टक्के मतदान झाले. तर मुंबईत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या आसपास होती.
मुंबई उत्तरमध्ये 46.91 टक्के, उत्तर मध्यमध्ये 47.32 टक्के आणि (Mumbai Election) मुंबई उत्तर पूर्वमध्ये 48.67 टक्के मतदान झाले. तर उत्तर पश्चिम मुंबईत सर्वाधिक 49.79 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई दक्षिणमध्ये शहरातील सर्वात कमी 44.22 टक्के मतदान झाले, तर मुंबई दक्षिण मध्य येथे 48.26 टक्के मतदान झाले.