बारामती (Election 2024) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. (Baramati LokSabha) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवार यांनी सभा आयोजित केली होती. प्रचार रॅलीनंतर काही तासांनी राष्ट्रवादीचे (एसपी) सुप्रिमो शरद पवार (sharad pawar) यांची तब्येत बिघडली. त्यांच्या प्रकृतीच्या माहितीनंतर राष्ट्रवादीने पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
शरद पवार यांनी सोमवारी दोन सभांचे नियोजन केले होते. पहिली रॅली शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांची होती. तर दुसरी रॅली अहमदनगर मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांची होती. मात्र, आता दोन्ही रॅली रद्द करण्यात आल्या आहेत. (Election 2024) निवडणुकीच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात 50 हून अधिक प्रचारसभा घेतल्या आहेत.
राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, डॉक्टरांनी पवारांना दोन ते तीन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यावेळी ते बारामती येथील निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पवारांना आदल्या दिवशी बारामतीत त्यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करताना घसा अस्वस्थ झाला होता. सोमवारी होणाऱ्या राजकीय रॅलीसह पवारांचे सर्व कार्यक्रम प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत.
83 वर्षीय पवार (sharad pawar) सध्या सुरू असलेल्या (LokSabha Election) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सक्रियपणे प्रचार करत आहेत. बारामती मतदारसंघात त्यांच्या कन्या आणि तीन वेळा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांचा सामना, त्यांच्या पुतण्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होत आहे. बारामती ही राज्यातील 11 लोकसभा जागांपैकी एक आहे. जिथे 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.