नवी दिल्ली (Election 2024) : लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान 7 मे रोजी होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 1300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, ज्योतिरादित्य सिंधिया, मनसुख मांडविया, प्रल्हाद जोशी या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
93 जागांसाठी 120 महिला उमेदवार
तिसऱ्या टप्प्यात (LokSabha Elections) लोकसभेच्या 93 जागांसाठी 120 महिला उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात सर्वांच्या नजरा प्रामुख्याने गुजरातमधील गांधी नगर, महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघ, मध्य प्रदेशातील राजगढ आणि उत्तर प्रदेशातील मैनपुरी मतदारसंघावर असतील. माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांवर 1300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत.
तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वाधिक उमेदवारी गुजरातमधून आली आहे. येथील (LokSabha Elections) लोकसभेच्या 26 जागांसाठी 658 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर (Maharashtra LokSabha) महाराष्ट्रात लोकसभेच्या 11 जागांसाठी 519 उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून 77 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या राज्यात होणार मतदान
आसामच्या 4 जागांवर मतदान
बिहारच्या 5 जागांवर मतदान
महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान
छत्तीसगडच्या 7 जागांवर मतदान
दादर नगर हवेली आणि दमण आणि द्विपच्या 2 जागांवर
गोव्याच्या 2 जागांवर मतदान
गुजरातच्या 25 जागांवर मतदान
कर्नाटकच्या 14 जागांवर मतदान
मध्य प्रदेशातील 9 जागांवर मतदान
उत्तर प्रदेशातील 10 जागांवर मतदान
पश्चिम बंगालच्या 4 जागांवर मतदान