मतदार याद्या अद्यावत करणे, नवीन मतदान केंद्राचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला
पुसद (Election Commission) : येथील उपविभागीय कार्यालयाच्या दालनात दि. 20 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वच राजकीय पक्षांच्या पदे अधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, निवडणूक विभागाचे लिपिक देवानंद राठोड व डाटा ऑपरेटर सत्यम राठोड उपस्थित होते.
यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्यावत करणे, मयत झालेल्या मतदारांची नावे कमी करणे, अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, अडचणीचे ठरणारे मतदान केंद्र ज्या ठिकाणी मतदारांना सोयी सुविधा नाहीत, अशा मतदान केंद्रामध्ये बदल करणे शिवाय ज्या मतदान केंद्रावर खोलीमध्ये चौदाशेच्या वर मतदार असतील त्यांना त्या मतदान केंद्रात कमी मतदार संख्या असेल. त्यामध्ये समाविष्ट करणे असे 21 प्रस्ताव यापूर्वी झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चर्चेअंती ठरलेल्या पाहणीमध्ये आढळलेल्या मतदान केंद्राचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे पाठविला असून त्यांच्यामार्फत मुंबई येथील निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयात दाखल झाला आहे.
अशा आशियाची माहिती, उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व पत्रकारांना उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिली. तर यापूर्वी अशा प्रकारच्या दोन-तीन बैठका घेतल्या चेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. हे विशेष. यावेळी पत्रकार दीपक महाडिक, विजय बाबर शिवसेना (उबाठा ), रवी पांडे शिवसेना (उबाठा ), आकाश रहाटे मनसे, लक्ष्मण कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, विलास वाघमारे तालुकाध्यक्ष काँग्रेस,पंजाब भोयर तालुकाध्यक्ष भाजप, बुद्धरत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी, जयानंद उबाळे वंचित बहुजन आघाडी, प्रसाद खंदारे वंचित बहुजन आघाडी, रुपेश जाधव भाजप, ज्ञानदीप कांबळे तालुका कार्याध्यक्ष काँग्रेस, राजीक देशमुख यांच्यासह इत्यादी उपस्थित होते.