Lok Sabha Election 2024:- लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत, 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान आज (25 मे) सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 49.20 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशच्या 14, बिहारच्या 8, हरियाणाच्या 10, पश्चिम बंगालच्या 8, ओडिशाच्या 6, झारखंडच्या 4, दिल्लीच्या 7 आणि काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी जागांवर मतदान (Voting) होत आहे. या टप्प्यात एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत. सर्व जागांचे निकाल ४ जूनला जाहीर होतील.
लोकसभा निवडणूक 2024
काँग्रेस (Congress)नेते रणदीप सिंग सुरजेवाला म्हणतात, “लोकांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याची माझी विनंती आहे. भाजप 150 जागांचा आकडाही पार करत नाहीये… देशाला रोजगार(Employment) हवा आहे, महागाई (inflation) नाही. आम्हाला दिलासा हवा आहे, आपल्याला मजबूत अर्थव्यवस्थेची गरज आहे, द्वेषाचे राजकारण संपवण्याची गरज आहे… मतदारांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे…”
भटिंडा लोकसभा निवडणूक 2024
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले, “मी ज्या प्रकारे देशभरात फिरलो, त्यावरून मी म्हणू शकतो की ‘4 जूनने 400 पार केली’… लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे… .लोकांनी पाहिले आहे की ते ( INDIA aliance) दिल्ली आणि पंजाबमध्ये आहेत. ‘आप’ आली तेव्हा काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोलत होते, पण आज जनतेला त्यांच्याबद्दल कळले आहे आणि त्यामुळे जनता भाजपसोबत आहे.