नाशिक (Election results) : निवडणुकीच्या प्रचाराच्या (Election Commission) काळात लग्नसराई असली, तर उमेदवारांसाठी पर्वणीच ठरते. कारण, लग्नात हजारो मतदारांची एकाच ठिकाणी गाठ भेट होते व अप्रत्यक्षपणे प्रचारही होतो. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी जर लग्नतिथी असेल, तर त्यादिवशी मतदानाचा टक्का घसरतो, परंतु येत्या ३ मेपासून लग्नसराईच्या धामधुमीला पुढील ५४ दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी लग्न मुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे, तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला. २० मे रोजी धुळे ,नाशिक, (Assembly Election) दिंडोरी मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
लग्नसराईला ५४ दिवस ब्रेक; २९ जूनलाच मुहूर्त
राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, यंदा २० मे रोजी सोमवारी लग्नतिथी नाही. यामुळे कार्यकर्त्यांचा ताण कमी झाला आहे. नाही तर लग्नसराईतून लोकांना आवाहन करून मतदान केंद्रात आणावे लागले असते. मात्र, उष्णतेची लाट असल्याने Assembly Election मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. मे मध्ये दोनच लग्नतिथी पंचांगात दिल्या आहेत. यात १ व २ व ५ मे या तीन तिथी आहेत. ५ मेपासून लग्नमुहूर्त नाहीत. यानंतर थेट २९ जूनलाच पुढील मुहूर्त आहे.