असे आहे संपूर्ण वेळापत्रक
मुंबई: लोकसभा निकालानंतर आणि महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळ संपण्याच्या एकही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे 11 सदस्य 27 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्या 11 जागांवर 12 जुलै रोजी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला आहे.या निवडणुलीत विधानसभा सदस्य विधान परिषदेच्या आमदारांची निवड करतात.
निवडणूक आयोगाने मंगळवारी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 25 जून ते 2 जुलै या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जुलै असेल. तर 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी (१२ जुलै) सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी सुरू होईल.
असे आहेत निवृत्त होणारे सदस्य
विधान परिषदेचे विद्यमान 11 सदस्य पुढील महिन्यात 27 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. या ११ विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे – डॉ. मनीषा कायंदे(शिवसेना), विजय गिरकर(भाजप), अब्दुल्ला दुर्राणी(एनसीपी) , निलय नाईक(भाजप), अनिल परब(उबाठा), रमेश पाटील(भाजप), रामराव पाटील(भाजप), डॉ. वागत मिर्झा(काँग्रेस), डॉ. प्रज्ञा सातव(काँग्रेस), महादेव जानकर(रासप), जयंत पाटील(शेकाप).