अकोला (Akola):- पातुर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक प्रल्हाद ठाकरे (५१) यांचा विजेचा शॉक(Electric shock) लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.
शॉक लागल्याने घटनास्थळावरच मृत्यू
पातूर पंचायत समितीमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद ठाकरे यांचे चोंढी येथे शेत जमीन आहे. शेतामध्ये उन्हाळी भुईमूग पेरल्याने त्याकरिता पाणी देण्याकरिता प्रल्हाद ठाकरे हे पहाटे सकाळी शेतामध्ये(Farm) गेले असता शेतामध्ये विहीर वर असलेली मोटर सुरू करण्यासाठी ते स्टार्टर (Starter)सुरू करीत असताना शॉक लागल्याने त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. प्रल्हाद ठाकरे हे पातूर येथील समर्थ नगर येथील रहिवासी असून पंचायत समिती अंतर्गत शिरला येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेवर शिक्षक या पदावर कार्यरत होत आहे त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मागे पत्नी , दोन मुली, आई, वडील असा आप्त परिवार आहे.