पोंभूर्णा(Chandrapur) :- विद्युत महावितरण (Electricity distribution) कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एकाच्या जीवावर घटना बेतली आहे. देवाडा बुज. येथील शेत शिवारात लाईन दुरुस्तीच काम करत असताना शेतकरी (Farmer)व लाईनमॅन यांनी रोजंदारीवर ठेवलेला कामगार शेतातील लाईट दूरस्ती करतांना शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. विजेचा शॉक लागून देवाडा बूज येथील नितेश भाऊजी आभारे (३४ ) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र दहा दिवसाच्या उपचारानंतरही त्याची प्रकृती चिंताजनक (Worrying)आहे.यादरम्या विद्युत वितरण कंपनीकडून जखमी शेतकर्याला कोणतीही आर्थिक मदत दिल्या गेली नसल्याने गावकर्यांनी रोष व्यक्त केला आहे.
खांबावर चढून डीओ टाकताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी नितीन आभारे याला जोरदार शॉक
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथील लाईनमॅन मुख्यालयी राहत नाही शिवाय चंद्रपूर ते घोसरीला ये-जा करत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. लाईनमॅन हेडाऊ यांना जखमी शेतकरी नितेश आभारे यांनी भ्रमणध्वनीवर(cell phone) शेतातील लाईट बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्युत तंत्रज्ञ (Electrical Engineer) हेडाऊ यांनी रोजंदारी कामगार यांनी शेतकरी नितेश आभारे यांच्या शेतातील विद्युत बंद आल्याचे जाऊन दुरस्ती करण्यासाठी सांगितले. त्यामुळे कामगार व शेतकरी नितेश आभारे यांनी शेतातील लाईट दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी व कामगार खांबावर चढून डीओ टाकताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी नितीन आभारे याला जोरदार शॉक (Shock) लागून त्याचा अर्धा शरीर जळून गेले, त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारसाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. मागील दहा दिवसापासून त्याचावर उपचार सुरू आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी जखमीला उपचारासाठी दिली आर्थिक मदत
मात्र त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. एवढी मोठी घटना विद्युत विभागाचे चूकीमुळे घडली असताना महावितरण कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. तसेच संबंधित लाईनमॅन हेडाऊ हा मुख्यालयी राहत नसल्याने हा प्रकार घडला असल्याने लाईनमॅन वरती कारवाई करण्यासाठी सरपंच हेमंत आरेकर व गावातील नागरिकांनी उपविभागीय अभियंता येनुरकर यांच्या कडे मागणी केली आहे.