मुरादपुर गावालगत घडली घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Electric shock) : चिखली तालुक्यातील मेरा बु येथील रहिवाशी असलेल्या बाप लेकाचा शेतात लोंबकळलेल्या (Electric shock) विजेच्या ताराला स्पर्श झाल्यानें विद्युत शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुरादपुर येथील शिवारात १३ जून रोजी सायंकाळी घडली.
दोन्ही मृतक मेरा बु येथील
अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police) अंतर्गत येणाऱ्या मेरा बु येथील रहिवाशी असलेले रामेश्वर उत्तम पडघान व त्यांचा मुलगा वैभव रामेश्वर पडघान हे मुरादपुर येथील गाडेकर यांच्या गावालगत असलेल्या शेतात काम करत होते. परंतु अचानक त्यांचा स्पर्श शेतात लोंबकळलेल्या (Electric shock) विज तारेला झाला आणि विद्युत शॉक लागून बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी तात्काळ (Andhera Police) अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील , विज वितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता पडघान यांना दिली . माहिती मिळताच दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वृत लिहेपर्यत घटनेचे कारण उघडकीस आले नव्हते. (Andhera Police) पोलिसांच्या तपासात काय प्रकार आहे हे निष्पन्न होईल हे मात्र खरे!