परभणी/पाथरी (Parbhani) :- शेतात रोप लागवड करत असताना विद्युत खांबातुन (Electric pole) जमिनीत उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा (electric current) धक्का बसल्याने एका अल्पभूधारक महिला शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील बांदरवाडा शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी घडली आहे .
विद्युत प्रवाहाचा धक्का आणि महिलेचा जागीच मृत्यू
या घटनेविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार ,पाथरी तालुक्यातील देवनांद्रा कारखाना परिसरात विठ्ठल नगर येथे
राहणार्या अल्पभूधारक शेतकरी पार्वती दशरथ आव्हाड (वय ४० ) ह्या मंगळवार २१ जानेवारी रोजी बांदरवाडा शिवारातील एका शेतात रोजंदारीने कांदा रोप लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रोप लागवड करत असताना शेतात असणाऱ्या विद्युत खांबावरील तानामधुन जमिनीत उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसला यात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. शेता शेजारील एका शेतकऱ्याने ही घटना पाहिल्यानंतर मृतक महिलेच्या पतीला घटनेची माहिती दिली . दरम्यान मृतदेह पाथरी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता . सायंकाळ पर्यंत याप्रकरणी पाथरी पोलीसांत घटनेची नोंद झालेली नव्हती .