परभणी/सोनपेठ(Parbhani) :- शेतात जात असलेल्या १८ वर्षीय तरूणाला शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांमुळे जोराचा शॉक(Electric Current) लागला. तरूणाला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील सोनखेड शिवारात घडली. या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सोनखेड शेत शिवारातील घटना
प्रकाश बळीराम राठोड यांनी खबर दिली आहे. अजय दिलीप राठोड वय – १८ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. अजय राठोड हा सोनखेड शिवारातील शेतात ज्वारीचे पीक सांभाळण्यासाठी गेला होता. रानडुक्कर पीक खाऊ नये म्हणून जात असतांना तरूणाला शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा (electrical conduit) जोरदार धक्का लागला. तरूणाला उपचारासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.विभीषण जाधव यांनी तरूणाला मृत घोषित केले. सोनपेठ पोलीसात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोनि.सुर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोह शिवाजी जाधव करत आहेत..!