सास्ती गावात वीज ग्राहकांकडून विजमीटर तपासणी म्हणून रक्कम वसुली
राजुरा (Electricity distribution) : घरगुती मीटर मध्ये छेडछाड करून विजेची चोरी करण्यात येत असल्याने (Electricity distribution) वीज वितरण कंपनीने विद्युत मीटर तपासणी हाती घेतली आहे. याकरिता कंत्राटी कामगाांना कामावर घेतले आहे. मात्र हे कामगार तपासणीच्या नावाखाली वसुलीचा गोरखधंदा करीत असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. (Electric meter) सास्ती गावात तीन तीन तपासणी कामगारांनी मीटर मध्ये छेडछाड करण्यात आल्याची बतावणी करून ५-६ वीज ग्राहकांकडून अवैद्य वसुली केल्याचा प्रताप उघड झाला आहे.
तिघांवर गुन्हे दाखल
दुसर्या दिवशी या टोळीने पुन्हा गावात येऊन वसुलीचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना गावकर्यांनी घेरून त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित निमजे, अर्जुन कुंभारे, करण कुंभारे सर्व राहणार अंचलेश्वर वार्ड चंद्रपूर असे वासुलीबाहद्दर आरोपींचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार (Electricity distribution) वीज वितरण कार्यालयातून घरगुती वापरात असलेले (Electric meter) विद्युत मिटर तपासणीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी ज्या क्षेत्रात मिटर तपासणीला जात आहे.
त्या कार्यक्षेत्रातील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांना माहिती देऊन ते सांगतील त्या ठिकाणी जाऊन तपासणी करणे व मिटरमध्ये छेडछाड केलेली असल्यास तसा अहवाल त्या कार्यक्षेत्रातील अधिकार्यांना देणे आवश्यक आहे. मात्र सास्ती या गावात मागील दोन दिवसांपासून विद्युत मिटर तपासणी करण्याच्या नावाखाली गावातील नागरीकांकडून मिटरमध्ये छेडछाड असल्याच्या नावाखाली स्वतःच रक्कम वसुली करीत होते. नागरीकांना यांच्या वागण्यात संशय आल्याने दि. ७ ऑगस्ट सकाळी अकरा वाजता सास्ती गावातील नागरीकांनी विज वितरण कंपणीच्या अधिकार्यांना व पोलीसांना फोन करुन घटनास्थळी बोलावून (Electric meter) मिटर तपासणी करणार्या टोळीला पोलीसांच्या ताब्यात दिले.
याबाबत राजुरा (Electricity distribution) विज वितरण केंद्र (ग्रामिण) सहाय्यक अभियंता गोपालसिंह राणा यांनी राजुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्यानुसार आरोपी रोहीत निमजे, अर्जुन कुंभारे, करण कुंभारे यांच्यावर राजुरा पोलीस स्टेशन येथे सास्ती गावातील पाच ग्राहकांकडून बेकायदेशिररीत्या पंचावण हजार रुपयाची अवैद्य वसुली केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर अपराध क्र. ४८३/२०२४ कलम ३०८ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, उपनिरीक्षक नरेंद्र उरकुडे, पोलीस हवालदार सयाम करीत आहे.
विद्युत मीटर तपासणी करणारे कंत्राटी कामगार यांना मीटर तपासणी करण्याचे काम असताना ते (Electric meter) मिटर तपासणीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली कोणाच्या आशीर्वादाने करीत होते. त्यासाठी ते कामगार कुणाची मर्जी सांभाळत होते. यासारखे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यांच्या या प्रतापावरून त्यांनी यापूर्वी आणखी किती वीज ग्राहकांची लूट केली हे तपासा अंती समोर येऊ शकते. या बेकायदेशीर वसुली मध्ये आणखी कोण सहभागी आहे. याचा उलगडा होणे बाकी आहे. या (Electricity distribution) कारनाम्यात अधिकार्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर सुध्दा कारवाही करण्याची मागणी ग्राहक करीत आहे.