परभणी शहर महापालिकेने धर्मापुरी, राहटी, कारेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्र परिसरात मोकळ्या जागेमध्ये सौर ऊर्जा निर्मिती करीता सौर पॅनल
परभणी (Solar energy) : अमृत योजनेंतर्गत शहर महापालिकेने कारेगाव आणि धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि राहटी येथील उद्भव केंद्र परिसरात सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. या (Solar energy) सौर ऊर्जा प्रकल्पातून एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत १८ लाख ६६ हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे. तिन्ही ठिकाणी मिळून १ हजार ३०० किलो वॅटचे प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणाहून निर्माण होणार्या विजेमुळे (Parbhani municipality) महापालिकेला दर महिन्याच्या देयकात जवळपास १० ते १२ लाख रुपयांची बचत होत आहे.
परभणी शहराला अमृत योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प देखील मंजुर झाले आहेत. या प्रकल्पातून धर्मापुरी येथे ८०० किलो वॅट, कारेगाव येथे २५० किलो वॅट आणि राहटी उद्भव केंद्र ठिकाणी २५० किलो वॅटचे सौर पॅनल बसविण्यात आले आहेत. या ठिकाणाहून (Solar energy) सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जात आहे. एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत या तिन्ही केंद्रातील १ हजार ३०० किलो वॅट प्रकल्पातून १८ लाख ६६ हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे.
मनपाला २ कोटी ६० लाखांचा फायदा
या वीज निर्मिती मधून (Parbhani municipality) शहर महापालिकेला २ कोटी ६० लाख रुपयांचा फायदा झाला आहे. महापालिकेचा पाणी पुरवठ्यावरील वीज देयकावर होणार्या खर्चात दरमहा जवळपास १० ते १२ लाख रुपयांची बचत झाली आहे. महापालिकेने शाश्वत वीज निर्मितीचा पर्याय म्हणून सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करण्याचा पर्याय शोधला आहे. जलशुध्दीकरण व उद्भव केंद्राबरोबर इतर ठिकाणच्या इमारतीवरील (Solar energy) सौर पॅनलमधून ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे.
शहर महापालिकेने (Parbhani municipality) विविध ठिकाणी (Solar energy) सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत निर्माण झालेल्या विजेतून महापालिकेला २ कोटी ६० लाख रुपयांचा फायदा झाला अहे. सौर पॅनल मधून शाश्वत वीज निर्मिती करण्यात आली आहे.
विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट
शहर महापालिकेने (Parbhani municipality) जलशुध्दीकरण केंद्र परिसरात (Solar energy) सौर पॅनल लावून वीज निर्मिती सुरू केली आहे. त्याच बरोबर आता महापालिकेची मुख्य इमारत इतर इमारती व खुल्या जागा आदी ठिकाणी सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. (Parbhani municipality) महापालिकेला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– धैर्यशील जाधव, मनपा आयुक्त.