देशोन्नती वृत्तसंकलन
भद्रावती (Electricity project) : तालुक्यात सुमारे २८ वर्षापूर्वी ११८३ हेक्टर २३ आर इतकी जमीन प्रस्तावित (Nippon Dendro Power Project) निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. प्राप्त झालेल्या माहिती नुसार या जमिनीवर दोन प्रकल्प उभारण्यात येणार असून सदर जमिनीची सिमा रेखा आखणीच्या (Boundary line drawing) कामाला दि. २८ मे रोज मंगळवार पासून सुरूवात झाली. सदर सिमा रेखा आखणीचे काम निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी आज रविवार दि. २ जुन रोजी सुमारे १ वाजताचे दरम्यान बंद पाडले.सिमा रेखा आखणी पूर्वी मागण्या पूर्ण करा . त्या नंतरच काम सुरू करा . असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांचा इशारा
यावेळी (Project affected) प्रकल्पग्रस्त शेतकरी वासुदेव ठाकरे ,प्रविण सातपुते,संदीप खुटेमाटे, लिमेश मानुसमारे, मधूकर सावनकर, सुधीर सातपुते, संदीप खुटेमाटे, चेतन गुंडावार, बबन डोये, रविंद्र बोढेकर, बाळकृष्ठ गायकवाड , बंडू भादेकर व इतर शेतकरी फार मोठया संख्येत उपस्थित होते. २८ वर्षापूर्वी १९९६ च्या सुमारास तालुक्यातील मौजा विजासन, कुडराडा (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ) तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावशिवारातील ११८३ हेक्टर २३ आर. इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी बारा ते चौदा हजार प्रतीएकर प्रमाणे कवडीमोल भावाने संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी २८ वर्षाचा प्रदिर्घ कालावधी लोटून सुध्दा आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. यामुळे संबंधीत शेतकरी परीवारातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले. याचा प्रतिकूल परीणाम म्हणून बेरोजगारीमुळे संबंधित परीवाराची एक पिढीच बरबाद झाली.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात नागपूर कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली, मात्र तोडगा निघाला नाही.सध्या प्रशासन व कंपनी स्तरावर ११८३ हेक्टर २३ आर. जमिनीवर दोन नवीन प्रस्तावीत प्रकल्प उभारणीची पूर्वतयारी सुरु आहे. मात्र आधी मागण्या पूर्ण करा. त्या नंतरच काम सुरू करा, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.