कोरेगाव,(Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील शंकरपुर पावर हाऊसला वारंवार गावठान वीजपुरवठा खंडीत (Power outage) होत असतो, त्यासाठी गावठान विद्युत गावात विजतारंनवर विविध समाज कार्यक्रमात तोरण लावले जाते. त्यामुळे ते तोरण तसेच ठेवल्याने वारा पावसात तारे ऐकमेकांना जोडल्याचाते त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असतो, त्यासाठी सर्व समाज बांधवांनी कुठल्याही विजतारांनवर तोरण लावु नये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला(distribution) सहयोग करावे असे महावितरण शंकरपुर पावरहाऊस(Powerhouse) अभियंता बोकळे यांनी जनतेला विनंती केली आहे.