२०२५ मध्ये वीज चोर महावितरणच्या रडारवर
फॉल्टी मीटर, सरासरी वीज बिल, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित, ग्राहकाची होणार तपासणी
अमरावती (Electricity theft case) : एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यात महावितरणकडून १ हजार १८४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईअंती या ग्राहकांनी ४ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तडजोड शुल्क भरून वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या (Electricity theft case) वीज चोरीच्या प्रकरणात कायदेशिर कारवाईला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांनी दिली आहे.
वीजचोरी पकडण्यासाठी महावितरण सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबविते. महावितरणकडून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एप्रिल-२०२४ ते डिसेंबर -२०२४ या नऊ महिन्यांत उघडकीस आणलेल्या (Electricity theft case) वीज चोरीच्या प्रकरणामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे ,मीटर बंद पाडणे,मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे,मीटरच्या मागच्या बाजूने छीद्र पाडत मीटरमध्ये रोध निर्माण करून मीटर बंद पाडणे किंवा मीटरची गती संथ करणे असे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे.
या सर्व ग्राहकांना ४ कोटी २८ लाख रुपयाची वीजचोरीची बिले देण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ५० वीज चोरी प्रकरणात (Electricity theft case) तडजोड शुल्कासह ४ कोटी २१ लाखाची वीजबिले भरण्यात आली आहेत.परंतू अजूनही पैसे भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या १३४ प्रकरणात कायदेशिर करवाई करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
संचालक(संचालन) श्री अरविंद भादीकर यांनी नुकताच अमरावती येथे घेतलेल्या बैठकित (Electricity theft case) वीज चोराविरूध्द होत असलेल्या कारवाईत नाराजी व्यक्त करत मोहिम तीव्र करून वितरण हानी १५%पर्यंत कमी करण्याचे उध्दीष्ट दिले आहेत. आगामी काळात जिल्ह्यात महावितरणकडून अधिक तीव्रपणे मोहिम राबविण्यात येणार आहे आणि या मोहित फॉल्टी मीटर, सरासरी वीज बिल असणाऱ्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरूवात करण्यात आली आहे. तसेच सवलत देऊनही अभय योजनेत कायम स्वरूपी (Electricity theft case) वीज पुरवठा खंडित असलेले सुमारे ७० हजार ग्राहक सहभागी झालेले नाहीत व त्यांनी पुनर्जोडणी घेतलेली नाही. त्यामुळे कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या सर्वच ग्राहकाची प्रत्यक्ष तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे.
वीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रावर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे भार पडतो, परिणामी रोहित्रात बिघाड होतो.शॉर्ट सर्किट होऊन (Electricity theft case) वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्याचा नाहक त्रास नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांवर होतो व महावितरणलाही त्याचा मोठा आर्थीक फटका होतो. याशिवाय वीज पुरवठा खंडित झाल्यावर महावितरणला ग्राहकाच्या रोषाला सामोरे जावे लागते.