हिंगोली (Electricity Theft) : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहिणीवर आकडे टाकुन विज चोरी करणार्या १४ आकडे बहाद्दरावर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विज चोरी (Electricity Theft) होते असल्याने महावितरणचे पथक अनेक गावोगावी जाऊन विजचोरी उघड करीत आहेत. यानिमित्ताने सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांच्यासह पथकाने २६ डिसेंबर२०२४ रोजी केलेल्या पाहणी दरम्यान काही घरामध्ये महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहिणीवर आकडा टाकुन विज चोरी करताना आढळुन आले.
त्यावरून सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांनी २९ जानेवारीला सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण दत्तराव तांबिले, सुभाष एकनाथ तांबिले, शिवाजी तुकाराम तांबिले, सतेभामा वसंत तांबिले, सोपान बबनराव तांबिले, त्र्यंबक तान्हाजी मोरे, दिगांबर पडीत पठाडे, चंद्रभान परसराम तांबिले, अश्रुजी सखाराम उगले, मिनाश्री संजय नालबंध, सय्यद गुलाब सय्यद गफुर, श्रीधरराव किसनराव फळटनकर, ज्ञानेश्वर रामजी गांधिले, रामदास पांडुरंग तांबिले सर्व रा. वाघजाळी यांच्यावर कलम १३५ विद्युत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.
सेनगाव तालुक्यात यापुर्वीही ४३ आकडे बहाद्दरावर गुन्हे दाखल
विज चोरीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या सुचनेवरून पथके गावोगावी जाऊन विज चोरी (Electricity Theft) उघड करीत आहेत. सेनगाव तालुक्यात महावितरणचे सहाय्यक अभियंता सत्यनारायण वडगावकर यांच्यासह पथकाने यापुर्वी कडोळी येथे २० तर केंद्रा खु. येथे २३ ठिकाणी विजचोरी उघड करून आकडे बहाद्दरावर गुन्हे दाखल करण्यात आले.