अनाधिकृतपणे वीज वापरुन केली चोरी परभणीतील नानलपेठ पोलिसात नोंद!
परभणी (Electricity Thieves) : अनाधिकृतपणे विजेचा वापर करुन वीज चोरी करणार्यांवर महावितरणने (Mahavitran) कारवाई केली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यात आले आहेत.
वीज चोरी विषयी विशेष तपासणी मोहिम!
मागील काही दिवसात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. महावितरण कडून विद्युत मिटर मधील छेडछाडची तपासणी, आकडे टाकून वीज घेणे तसेच इतर मार्गाने होणार्या वीज चोरी विषयी विशेष तपासणी मोहिम राबविली जात आहे. २६ ऑगस्टला नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद बळवंत, तुकाराम वडवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वीज ग्राहक रईसा अंजुम, फरीदा बेगम शेख, उजमा अन्सारी, शेख जमील, मोहम्मद तारीख, शेख खय्युम, एम.डी. सलीम, सोहेल खान यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. संबंधित वीज ग्राहकांनी स्वत:च्या फायद्यासाठी महावितरण कंपनीच्या परवानगी शिवाय अनाधिकृतपणे वीज चोरी करुन वापर केला. सदरील प्रकरणात महावितरणच्या पथकाकडून परभणी शहरातील जमजम कॉलनी, दर्गा रोड, बिस्मील्ला कॉलनी, पारवा गेट आदी भागात कारवाई (Action) करण्यात आली आहे.
