परभणी (Parbhani):- शहर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत(Department of Health) शहरामध्ये हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या दरम्यान सदर मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या दरम्यान सदर मोहिम राबविण्यात येणार
हत्तीरोग (elephantiasis) बाधित नसलेल्या जिल्ह्यातील रक्त नमुने संकलन एमएफ सर्वेक्षण ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या बाबत सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्याने जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने ९ ते १४ डिसेंबर दरम्यान मध्यरात्री आठ ते बारा या वेळेत महापालिका अंतर्गत आदर्श नगर आणि रमाबाई नगर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. २० वर्ष पुढील कोणत्याही व्यक्तीचे नमुने घेऊन त्यांच्या रक्तात हत्तीरोगाचे मायक्रोफायलेरीया (Microfilaria) आहेत की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे.