अमरावती(Amravati) :- चाेरीच्या दुचाकी प्रकरणात पाेलीसांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पाेलीसांनी चाेरीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चाेरी चोरणाऱ्या चार आराेपींना अटक करण्यात आली आहे. पाेलीस आयुक्तालयातील (Commissionerate) गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
दुचाकी चाेरीचा तपास लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने गुप्त पद्धतीने माहीती मिळविली
शहरातून होणाऱ्या दुचाकी चाेरीचा तपास लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने गुप्त पद्धतीने माहीती मिळविली हाेती. राजापेठ हद्दीत दाखल असणाऱ्या दुचाकी चाेरी प्रकरणात पाेलीसांनी आराेपींना ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी केली असता त्यांनी चाेरीच्या गुन्ह्याची कबूली दिली. पाेलीसांनी हेमंत राजेश चिलवंते (23, रा. पाचबंगला, जुनी वस्ती बडनेरा), प्रदीप विजय बांगर (19, रा. अंबिका नगर, आकृती नगर, अकाेला), राेशन राजू गावंडे (24, रा. पाच बंगला, जुनी वस्ती बडनेरा), अमीत नरेश ग्वालानी (34, रा. सिंधी कीम्प अमरावती) यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाेलीस काेठडी सुनावली. आराेपींजवळून एकुण 11 चाेरीच्या दुचाकी जप्त (confiscation) करण्यात आल्या आहेत. आराेपींजवळून 4 लाख 17 हजार रूपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पाेलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त सागर पाटील, श्रीमती कल्पना बारवकर, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे 2 चे निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक महेश इंगाेले, सत्यवान भुारकर, उपनिरीक्षक संजय वानखडे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र काळे, अंमलदार जावेद अहमद, गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, संग्राम भाेजने, मंगेश शिंदे, चंद्रशेखर रामटेके, चेतन कराडे, याेगेश पवार, राजीक रायलीवाले, चालक संदीप खंडारे, प्रतीक यादव यांच्या पथकाने केली.