हिंगोली(hingoli):- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीत ६ जुलैला भव्य मराठा महाएल्गार संवाद रॅलीचे(Rally) आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने जिल्हाभरात ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. यासाठी सकल मराठा समाजातील अनेकजण कॉर्नर बैठकांवर भर देत आहेत.
६ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात भव्य मराठा महाएल्गार संवाद रॅलीचे आयोजन
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा शासनाविरूद्ध एल्गार पुकारला आहे. मराठा आरक्षण व सगे सोयर्यांच्या नोंदी संदर्भात शासन उदासिनता दाखवित असल्याने सकल मराठा समाज आक्रमक (Aggressive) झाला आहे. त्या निमित्ताने ६ जुलै रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात भव्य मराठा महाएल्गार संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त २३ जूनला हिंगोली तालुक्यातील वडद, एकांबा, बोडखी, आंबाळा येथे कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. यावेळी रमेश शिंदे, माधवराव कोरडे, अॅड.अमोल जाधव, डॉ.प्रल्हादराव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व सकल मराठा समाज(Maratha society) मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने व्रजमुठ बांधली आहे. तसेच मराठा महाएल्गार संवाद रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या संकल्प अनेक गावोगावी सकल मराठा समाजातर्पेâ करण्यात आला आहे. या रॅलीकरीता पुरूषांसोबत महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जवळपास २ लाखापेक्षा अनेक सकल मराठा समाजातील नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.